सामाजिक, पर्यावरण व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी श्री. शिरीष सुभाष वाघुंडे, (पुणे) यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२१ हा देऊन गौरविण्यात...
आमचा उद्देश्य
खरतर श्री गुरुमाउली सेवा भावी संस्थेचा उद्देश्य. ज्या कुटुंबीयांनी आपल्या वयोवृद्ध लोकांना घराबाहेर काढलेले आहे.. त्यांची घरवापसी आहे.. परंतु जो पर्यत घरवापसी होत नाही.. तो पर्यत अशा वयोवृद्ध लोकांसह… अनाथ वयोवृद्ध लोकांना.. आपण निराधार नाहीत.. आपले सुद्धा कोणीतरी आहे.. हि भावना त्यांच्यात जागृत करत.. उतारवयांत आवश्यक असलेल्या सुख सोयी त्यांना उपलब्ध करवून देत.. त्यांचे जीवन सुखकर करणे.. असा शुद्ध आणि प्रामाणिक उद्देश्य आहे..
आश्रमातील सुख सुविधा

धार्मिक-अध्यात्मिक उपक्रम
आश्रमात विविध सण उत्सव सह.. दररोज विविध आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात.. जसे टाळ मृदुंगाच्या तालावर हरिपाठाचे पठन केले जाते.. ज्ञानेश्वरी सह विविध आध्यात्मिक ग्रंथांचे सुद्धा पठन केले जाते..

सुरक्षितता
संपूर्ण आश्रम CCTV देखरेख खाली आहे.. तसेच येथे रात्रपाळी सह दिवसा सुरक्षारक्षक आहे..

भोजन व्यवस्था
आश्रमात उतारवयातील शरीराला मानवेल आणि पचेल असे शुद्सध शाकाहारी जेवण दिले जाते.. ह्या मध्ये चहा नाष्टा आणि दोन वेळचे जेवण दिले जाते.. विशेष म्हणजे सर्व आजी-आजोबा एकत्रित जेवणास बसतात.. जेवणाला बसण्यापूर्वी सामुदायिक मंत्र श्लोक बोलण्याची प्रथा आहे.. थोडक्यात आपण सर्व एकत्र कुटुंबात आहोत हा भाव सर्वामध्ये जागृत व्हावा हा उद्देश्य..!!

मेडिकल
ज्या ज्या आजी आजोबांना गोळी औषध सुरु आहे.. त्यांची खास देखरेख करत.. दिवसातील ठरलेल्या वेळेत मेडिकल सेवा दिली जाते.. इतकेच नव्हे तर अचानक काही दुखणे- आजार त्रास झाल्यास रुग्णवाहिका सह डॉक्टर सेवा सुद्धा उपलब्ध करवून दिली जाते..!!

परसबाग
आश्रमाच्या सभोवताली.. परसबाग आहे.. ह्या मध्ये विविध आयुर्वेदिक वनस्पती.. झाडे लावलेली आहे.. आणि अजून सुद्धा हे काम सुरु आहे.. निर्सगाचा आस्वाद आणि ह्यातून मिळणारी मन:शांती आजी आजोबांना लाभावी हा उद्देश्य..!!

मनोरंजन
आश्रमात टीव्ही – टेप – साउंड सारखे मनोरंजनाचे साधन सुद्धा उपलब्ध आहे.. विविध कार्यक्रम.. गाणी ऐकत.. मनोरंजन व्हावे.. हा उद्देश्य !!
कृतज्ञता
सदर गुरुमाउली सेवा भावी संस्थेच्या ह्या उपक्रमाची दखल घेवून.. असंख्य लोक ह्या कार्यास हातभार लावत.. आपले विशेषदिन जसे वाढदिवस वगैरे आश्रमातील आजी आजोबां सोबत साजरे करत.. ‘अन्नदान’..’धनदान’.. ‘श्रमदान’.. ‘वस्त्रदान’ सह विविध माध्यमातून मदत करत आहेत.. आणि आम्हाला सेवा करण्याची प्रेरणा देत आहे.. अशा सर्व लोकांना आम्ही कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो आहे..
पालकत्व
देणगीदार
पुरस्कार
घरवापसी
सामाजिक पुरस्कार
श्रीसुभाष वाघुंडे यांना “समाजरत्न” पुरस्कार
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं.७, काळाराम मंदिर मागे व नेवासारोड, रेल्वे ओव्हरब्रीज खालील श्री गुरुमाऊली सेवाभावी संस्था" संचलित "माऊली वृद्धाश्रम" चे अध्यक्ष श्री.सुभाष वाघुंडे यांना येथील नागेबाबा उद्योग समुह यांच्या प्रेरणेने व महाराजा बहुउदेशीय प्रतिष्ठान, सोशल...
राष्ट्रीय संत गाडगे बाबा पुरस्कार २०२०
शब्दगंध साहित्य परीषद अहमदनगर , शाखा श्रीरामपुर व राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियन महाराष्ट्र राज्य शाखा श्रीरामपूर यांच्या सयुक्त विद्यमाने श्री. संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्ते श्री. सुभाष दशरथ वाघुंडे यांना मानवसेवा पुरस्कार म्हणून "राष्ट्रीय संत गाडगे बाबा...
वृत्तपत्र आणि माध्यम
माऊली वृद्धाश्रमला ‘ सावित्री च्या लेकींचा’ मदतीचा हात!!
सावित्रीच्या लेकी सेवा मंचा ने राजमाता जिजाऊ जयंती निमीत्त माऊली वृद्धाश्रमात जाऊन मदत केली
तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वृद्धाश्रमात साजरा केला वाढदिवस
श्रीरामपुर /प्रतिनिधी अनेक जण आपला वाढदिवस पार्टी देवुन मोठ मोठ्या हाँटेलमध्ये साजरा करतात पण श्रीरामपुरातील एका अवलीयाने आपला वाढदिवस चक्क वृध्दाश्रमात जावुन साजरा केला या अवलीयाचे नाव आहे तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपुरचे तहासीलदार प्रशांत पाटील यांचा...
आपणही सहभाग होऊ शकता
यासाठी आपण माऊली वृध्दाश्रमसाठी देणगीदार बनून दर वर्षी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा आपल्या घरातील वाडवडिलांच्या, पुर्वज्यांच्या स्मरणार्थ फक्त एकच दिवस अन्नदान करू शकतात म्हणजे प्रत्येकावर खूप आर्थिक लोड पण येणार नाही. असे ३६५ दिवस बुक झाले की मग आश्रमाचा रोजचा खाण्यापिण्याचा प्रश्न मिटेल. वर्षाचे २५०० ₹ म्हणजे रोज फक्त ६.८४ ₹ आणि ही तर फक्त अर्ध्या चहाची किंमत आहे. असेही आपण रोज सक्षम लोकांना एकतरी चहा पाजतोच की ! यातूनच या आजी आजोबां साठी अर्धा कप आपण बाजूला काढूयात ! या व्यतिरिक्त सेवेकरी पगार, ऍम्ब्युलन्स, औषधे, कपडे, वीजबिल, फोनबिल, प्रशासकीय खर्च, बिल्डिंग मेंटेनन्स, फर्निचर मेंटेनन्स, अकौंटिंग, स्टेशनरी असे बरेच खर्च भागवण्यासाठी पण देणगी लागेल ती पण कशी गोळा करता येईल याचा विचार करू. जे देणगी देऊ शकणार नाहीत ते देणगीदार मिळवून देऊ शकतात किंवा तसेच आश्रमासाठी आठवड्यातून एक तास देऊ शकता किंवा येथील आजी आजोबांसाठी जुने पण सुस्थितीतील कपडे गोळा करू शकता किंवा आपल्या घराच्या परिसरात धान्य फेरी काढू शकता. इच्छा असेल तर असे अनेक मार्गाने आपण आपले योगदान देऊ शकतो. यासाठी नियमित एकत्रच आले पाहिजे असे काही नाही, व्हाट्स अप ग्रुप बनवून नियमित संपर्कात राहू आणि खूपच गरज पडली तर एकत्र देखील येऊ.
देणगीसाठी बँक खाते माहिती
नाव – श्रीगुरु माऊली सेवाभावी संस्था
अका.नं. – 508901010035385
IFSC Code : UBIN0550892
बँक – युनियन बँक ऑफ इंडिया
शाखा – श्रीरामपूर
Account Name: Shri Gurumauli Sevabhavi Sanstha
Account No: 508901010035385
IFSC Code : UBIN0550892
Bank Name: Union Bank of India
Branch : Shrirampur
कृपया देणगी केल्या नंतर खालील इमेल आयडी वर किंवा 9850955596 नंबर वर स्क्रीनशॉट पाठवणे.
(After Donation kindly send the screen shot on below Email-ID or on 9850955596 number)
Email id – maulivrudhashram2016@gmail.com
संस्थेचा परिचय व विश्वस्त मंडळ
हा आश्रम २९/१०/२०१७ रोजी याचे श्री. सुभाष दशरथ वाघुंडे यांनी कुठल्याही सरकारी मदती शिवाय वैयक्तिक ७ लाख कर्ज काढून उभारला असून ते स्वखर्चाने हा आश्रम चालवतात. त्यांच्या पत्नी सौ. कल्पना वाघुंडे आणि त्यांचा मुलगा श्री. शिरीष वाघुंडे बहुतांश आर्थिक भार उचलतात. आश्रमाला काही देणगीदार पण मदत करतात. हा आश्रम एक गुंठा जागेत असून दोन रूम, एक छोटे किचन, बाथरूम, टॉयलेट असा अतिशय दाटीवाटीच्या परिस्थिती मध्ये सध्या चालू आहे. या छोटेखानी जागेत सध्या ५ आजोबा, ६ आज्या, १ किशोरवयीन अनाथ मुलगा आणि ३ पगारी सेवेकरी असे एकूण १५ जण राहतात. आश्रम फुल असून बऱ्याच नवीन येणाऱ्यांना ठेऊन घेता येत नाही. यातील एक एक व्यक्तीची करूण कहाणी ऐकली की आपण माणूस असल्याची लाज वाटते. वेळोवेळी अन्नदान, वस्तू दान, कपडे दान करत असतात. दिवाळीला ताजा फराळ देत असतात. तसेच आश्रमातील सर्वांची मोफत वैद्यकीय तपासणी पण करत असतात. अशा अनेक मार्गाने मदत मिळते आहे, पण ती अजूनही तोकडी पडते. त्यामुळे सदर आश्रमाला मदतीची गरज आहे. यासाठी आपण माऊली वृधाश्रमासाठी देणगीदार बनून दर वर्षी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा आपल्या घरातील वाडवडिलांच्या,पुर्वज्यांच्या स्मरणार्थ अन्नदान करू शकता. म्हणजे प्रत्येकावर खूप आर्थिक लोड पण येणार नाही.

श्री. सुभाष दशरथ वाघुंडे
संस्थापक अध्यक्ष
हा आश्रम २९/१०/२०१७ रोजी याचे श्री. सुभाष दशरथ वाघुंडे यांनी कुठल्याही सरकारी मदती शिवाय वैयक्तिक ७ लाख कर्ज काढून उभारला असून ते स्वखर्चाने हा आश्रम चालवतात. त्यांच्या पत्नी सौ. कल्पना वाघुंडे आणि त्यांचा मुलगा श्री. शिरीष वाघुंडे बहुतांश आर्थिक भार उचलतात. आश्रमाला काही देणगीदार पण मदत करतात.
सौ. कल्पना सुभाष वाघुंडे
सचिव
श्री. सुभाष दशरथ वाघुंडे
सदस्य
आमचा पत्ता
माऊली वृध्दाश्रम
काळा राम मंदिर मागे, वार्ड नं. ७, श्रीरामपूर, जी. अहमदनगर
संपर्क क्रमांक – 9850955596, 8087512973
contact@MauliVrudhashram.org maulivrudhashram2016@gmail.com
संपर्क





